आजचे युग हे इंटरनेट चे युग आहे असे म्हटले जाते. या इंटरनेट ने अगदी खेडीपाडी वाडी वस्त्या एकमेकांशी जोडल्या. अगदी शेतात काम करणारा शेतातील मजूर असो की मग एखादा गुराखी अगदी एक क्लिक वर दिल्ली मध्ये काय सुरू आहे हे पाहू लागला आहे.
जग बदलल तशी बोलीभाषा बदलायला लागली. काही लोकांच्या डोक्यात प्रमाण भाषेच भूत संचारल, आणि यामुळे बोलीभाषेतील काही शब्द अडगाळीला पडायला लागली. आपण अश्याच काही शब्दांचा संग्रह पाहणार आहोत. तुम्ही देखील तुम्हाला माहिती असलेले असे शब्द कमेंट मध्ये टाकू शकतात.
- 1. इळानमाळ: दिवसभर / संपूर्ण दिवस
उदा: लेकरू इळानमाळ उपाशी हाय. (मूल दिवसभर उपाशी आहे.) - 2. झुंजुरका: पहाटे
- 3. तामटाच्या आत: पहाटे.
4. राच्च: रात्रीच
5. दुहयाणी: परत एकदा / दुसऱ्यांदा
6. उजाड: प्रकाश
उदा: सूर्य उगला (उगवला) की उजाड पडल.
7. कव्हर: किती वेळ.
उदा: कव्हर वाट बघत बसु (किती वेळ वाट पाहत थांबू?)
8. अजून: आणखी
उदा: अजून लाईट आली नाही. (आणखी लाईट आली नाही.)
9. नैतरणा: तरुण
उदा: नैतरणा गडी असून असा का गळून बसलास.
10. उलसक / उलशीक : किंचित / थोडेसे
उदा: जेवण वाढताना ग्रामीण भागात खालील वाक्य एकायला मिळते.
उलशीक घ्या अजून त्यात काय होतय. (आणखी घ्या थोडेसे, काही होत नाही.)
11. उली उली: थोड थोड
12. मोहर / म्होर: पुढे.
उदा: जरा म्होर गेल की लगीच गाव येईल.
13. यरवाळी / येरळी: हा शब्द दोन ठिकाणी वापरतात.
सकाळी लवकर. उदा: आज येरळीच उठून शेतात गेलो.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी. उदा: यरवाळी घराकड या. (संध्याकाळी लवकर घरी या.)
14. घावल / गावल: आढळले, सापडले
उदा: शेतात जात असताना मला दहा रुपये गावले (सापडले).
15. महयावल / तुहयावाल : माझ / तुझ
उदा: महयावल शर्ट नाय हे तुहयावाल हाय.
16. गुमान: मुकाट्याने
उदा: जे भेटतय ते गप गुमान खा.
17. मायचान(आई शपथ):
उदा: मायचान खर बोलतोय र
18. हेलपाटा: फुकट झालेली चक्कर. (काम न होता परतने)
उदा: साहेबच आले नव्हते म्हणून कचेरीत उगाच हेलपाटा झाला.
19. किंवडा: बहिरा
निजणे: झोपणे
20. मावळण: आत्या
21. कलरी: कलवरी (नवरी / नवरदेवाची बहीण)
22. वरधावा = नवरदेवाचा लहान भाऊ
23. इवाही: व्याही
24. मालक: नवरा
25. मालकीण: बायको
26. परण्या: लग्न लागण्याच्या पहिले नवरदेव वाजत गाजत मारोतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो.
27. औंदा: यावर्षी
उदा: औंदा पाऊस बरा पडायला पाहिजे.
28. डोरल: मंगळसूत्र
29. कोडगा: निगरगट्ट, निर्लज्ज
30. गचांडी: गळा दाबणे, पकडणे
31. अडगा: अडाणी
32. आण: शपथ
33. सयपक: स्वयंपाक
34. कोरडयास / कोडयास: ओली भाजी
35. कोंगाडी: न समजणारी भाषा.
36. फुपाटा: धुळ,
37. खकाणा: धूळ
38. उकणदा: उकिरडा
39. कालवड / कर्हड : लहान गाय
40. वघार: लहान म्हैस
41. बासण: भांडे
42. केरसुणी: झाडू
43. पाटी: टोपली
44. इस्तू: विस्तव
45. डांब: खांब / पोल
46. मार्तुल – स्क्रू ड्रायव्हर
47. गोळा: बल्प
48. गुंडी: बटन
49. इस्तरी: इस्त्री
50. निचेतीन: सावकाश
51. वाढूळचा: केव्हाचाच
उदा : म्या वाढुळचाच येऊन बसलो, तुमचाच काय पत्ता. (मी केव्हाच आलो आहे, तुम्हीच उशिरा आले)
52.ईस्कटून: पसरवून / सुटसुटीत
उदा: मला काही समजणा काय बोलायलास जरा ईस्कटून सांग.
53. बिगिनं: लवकर
54. धुपण: धूर
55. काउण / कऊन : कशामुळे
56. वळकील का?: ओळखल का?
57. गवसणे: शोधणे
58. परसाकड: बाथरूम ला
59. शिशी: बाटली
उदा: तेलाची शिशी घेऊन ये दुकानातन.
60. गिण्यान: ज्ञान
उदा: तोह गिण्यान काय मातीत गेल का?
61. इपीतर: अवखीळ / खोडकर
उदा: इपीतर बेन हाय ते. (अवखीळ मुलगा आहे तो)
62. आडमुठ / ठा: दादागिरी करणारा
उदा: आडमुठ हाय ते, त्याच नदाला नग (नको) लगायला.
63. कुडत / आंगड: शर्ट / सदरा
64. खमिस: शर्ट / सदरा
65. पिशी: पिशवी
66. इजार: पॅन्ट
67. खेटर: बूट
68. खंगाळून: स्वच्छ करून.
उदा: बासण तेवढे खंगाळून घे.
69. भीताड: भिंत
70. कवाड: दरवाजा
71. न्हाणी: बाथरूम (स्नानग्रह)
72. जांब: पेरू
73. नादर: छान
74. चाभरा: खूप बोलणारा
75. दाव: दाखव
76. निजला: झोपला
77. हाथरून: अंथरूण
78. दुरडी: भाकरी ठेवायची टोपली
79. बाचक / चुंगड: धान्याचे छोटे पोते
80. हब्रेड: हायब्रिड
81.हाटकून: मुद्दामहून
82. बेजार / बेजरी: दगदग
83. हुद्दा: काम / उद्योग
84. हपकून जाणे: हिंमत खचणे
85. बुरसो – घाणेरडा वा पारोसा (आंघोळ न केलेला)
86. भायर: बाहेर
86. आज आडदी: एक आठवड्यापूर्वी आजच्या दिवशी
87. बुधारी: बुधवारी
88. हाळी: हाक
89. अब्दा: हाल किंवा गैरसोय
90. मायंदाळ: पुष्कळ / भरपूर / जास्त
91. गरा : रवा
92. खर्डा : मिरचीचा ठेचा
93. माळव: भाजीपाला
94. भुरकी : लाल तिखट
95. वशाट : चिकन / मटन
96. टकुच: बाळाची टोपी
97. सांडशी: पक्कड
98. हापशी: हातपंप
99. फतकल: अस्त व्यस्त मांडी घालून बसणे.
100. देवळी: घराच्या भिंतीत वस्तु ठेवण्यासाठी तयार केलेला कप्पा
101. माडी / माढी: घराचा वरचा मजला
102. शीव: गावाची हद्द
103. पल्याड: पलीकडे
104. आल्याड: अलीकडे
105. बिगिन: लवकर
106. मढ: प्रेत
107. मंजी: म्हणजे